अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पूर्ववैमनस्यातून एका युवकाला दोघांनी मारहाण करून त्याच्यावर ब्लेडने वार केल्याची घटना रविवारी (दि. 16) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास रेणुकामाता रस्त्यावर, समर्थनगरमध्ये घडली. रमजान निजामुद्दीन अन्सारी (वय 22 रा. मोरया पार्क, पाठीमागे, आनंद पार्क, बोल्हेगाव) असे जखमी युवकाचे नाव आहे.
- Advertisement -
त्यांनी सोमवारी (दि. 17) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री रमजान अन्सारी त्यांच्या दुचाकीवरून कंपनीत ड्युटीवर जात असताना ही घटना घडली आहे.