Friday, September 11, 2026
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलाने केला वृध्दाचा खून

Crime News : अल्पवयीन मुलाने केला वृध्दाचा खून

एमआयडीसी पोलिसांकडून 24 तासात उकल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एमआयडीसी परिसरात दाढी कटिंगसाठी घराबाहेर पडलेल्या वृध्द व्यक्तीचा निर्जन डोंगराळ भागात निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांत छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याचे निष्पन्न झाले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

बापुराव नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, सह्याद्री चौक, एमआयडीसी) हे 13 फेब्रुवारी रोजी दाढी कटिंग करून येतो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, ते घरी परत न आल्याने त्यांच्या मुलगा मनोज बापुराव शिंदे यांनी 14 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी रात्री साईबन परिसरातील निर्जन डोंगराळ भागात एका वयोवृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. चौकशीत तो मृतदेह बापुराव शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.

तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात संकलित करून त्याचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण केले. घटनास्थळाजवळील हालचाली, संशयास्पद व्यक्तींची ओळख आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेत सलग तपास करण्यात आला. तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही विश्लेषणाच्या आधारे एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या पालकांच्या उपस्थितीत सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सहाय्यक निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद परदेशी, उपनिरीक्षक मनोज मोंढे, उपनिरीक्षक विकास जाधव, अंमलदार राकेश खेडकर, राजू सुद्रीक, संदीप पवार, सचिन आडबल आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

ताज्या बातम्या

टिप्पर

Nashik Crime News: नाशकात लेडी ब्लॅकमेलरची दहशत; सीएला तब्बल १० लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधीआर्थिक फसवणूक व्यवहारातून आणि त्यानंतर पोलिसांत खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत सीए (चार्टर्ड अकाउंटंट) कडून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या एका हायप्रोफाईल महिलेचा पराक्रम...