नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘आम्ही पोलीस आहोत’ अशी असल्याची बतावणी करीत दोघांनी ७४ वर्षीय वृद्धास (Old Man) गंडा घातला. वाहनाची तपासणी करण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी वृद्ध व्यक्तीकडील ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (Gold ornaments) नेले. काठे गल्ली येथील बनकर चौक परिसरात हा प्रकार घडला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगून तरुणाला लाखोंचा गंडा; गुन्हा दाखल
याबाबत अधिक माहिती अशी की, विक्रम मोतीराम निकम (७४, रा. काठेगल्ली) यांच्या फिर्यादीनुसार भामट्यांनी २३ मे रोजी सकाळी दहा वाजता बनकर चौक येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राजवळ फसवले. निकम हे परिसरातून जात असताना दुचाकीस्वार दोघे त्यांच्याकडे आले. त्यांनी दोघांची ओळख पोलिस (Police) असल्याचे सांगत निकम यांच्या दुचाकीची तपासणी करण्याचा बहाणा केला.
हे देखील वाचा : Nashik Crime News : वडाळागावात २८ किलो गांजा जप्त; क्राईम ब्रान्चची कारवाई
त्याचप्रमाणे निकम यांच्या अंगावरील सोन्याचे दगिने काढून तो डिक्कीत ठेवण्याच्या बहाण्यान दागिने परस्पर लंपास केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयितांच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. त्यानुसार पोलिस संशयितांचा (Suspects) शोध घेत आहेत.
वृद्धेच्या एटीएमकार्डचा गैरवापर
एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एकाने वृद्धेच्या एटीएम कार्डचा वापर करून परस्पर ३० हजार रुपये काढून फसवणूक केली. सोमवारी (दि.२७) जेलरोड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात हा प्रकार घडला. अलका शिवाजी पाटील (६४, रा. जुना सायखेडा रोड, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार त्या सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या. त्यावेळी पैसे काढून देण्याच्या बहाण्याने भामट्याने अलका यांचे एटीएम कार्ड घेत त्यांना दुसरे कार्ड दिले. त्यानंतर भामट्याने अलका यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यातून ३० हजार रुपये परस्पर काढले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अलका यांनी नाशिकरोड पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. पोलिस तपास करीत आहेत.