Friday, April 10, 2026
Homeक्राईमAhilyanagar : वृध्देवर अत्याचार करणार्‍यास 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

Ahilyanagar : वृध्देवर अत्याचार करणार्‍यास 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

वृध्द महिलेवर (वय 74) अत्याचार करून काचेच्या बाटलीने मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ठोठावण्याचा महत्त्वपूर्ण निकाल येथील विशेष जिल्हा न्यायाधीश डॉ. यु. जे. मोरे यांनी दिला. राजू साहेबराव काते (वय 40, रा. लालटाकी, अहिल्यानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

11 नोव्हेंबर 2021 रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास 74 वर्षीय महिला आपल्या घरी एकटी असताना राजू काते याने तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर त्याने काचेच्या बाटलीने तिच्या डोक्यात मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजू काते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. यू. मोरे यांनी करून राजू काते विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडित महिला, तपासी अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

सरकारी पक्षाचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. राजेश त्रिमुखे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, घटनेच्या वेळी पीडित महिला 74 वर्षांची होती, तर आरोपीचे वय 40 वर्षे होते. पीडित महिला अत्यंत गरीब परिस्थितीत झोपडीत एकटी राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होती. अशा परिस्थितीत आरोपीने तिच्या वयाचा व परिस्थितीचा कोणताही विचार न करता तिच्यावर अत्याचार केला. आरोपीची मानसिकता विकृत असून अशा व्यक्तीमुळे समाजातील महिलांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि सादर झालेला पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली.

ताज्या बातम्या

एकनाथ

Eknath Shinde: ठाकरेंच्या खासदारांसोबत खरच गुप्त बैठक झाली का? उपमुख्यमंत्री एकनाथ...

0
सातारा | Sataraमहाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी उलथापालथ होण्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन...