Tuesday, June 25, 2024
Homeक्राईमदेवदर्शन करून घरी जाताना वृध्देचे गंठण ओरबडले

देवदर्शन करून घरी जाताना वृध्देचे गंठण ओरबडले

झोपटी कॅन्टींग परिसरातील घटना || दीड तोळ्याचे गंठण लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

देवदर्शन करून रस्त्याने पायी घरी जात असताना वृध्द महिलेच्या (Old Woman) गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण (Chain Snatching) दुचाकीवरील दोघांनी ओरबडून नेले. सोमवारी (दि. 27) रात्री 9:10 वाजता झोपटी कॅन्टींगच्या समोर माऊली संकुलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दोघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा मंगळवारी (दि. 28) दाखल झाला आहे. मंदाकिनी मधुसुदन दगडे (वय 70 रा. सिव्हील हाडको, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

मंदाकिनी यांची मुलगी भारती विपुल कासार (रा. गोरेगाव वेस्ट, मुंबई) सुट्टी असल्याने नगरमध्ये आल्या आहेत. त्या दोघी सोमवारी रात्री साडेआठ वाजता प्रेमदान चौक, सावेडी येथील दत्त मंदिरामध्ये दर्शनाकरीता गेल्या होत्या. दर्शन करून पुन्हा घरी पायी जात असताना 9:10 वाजता माऊली संकुलजवळ पाठीमागून अचानक दुचाकीवरून दोघे आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या एकाने मंदाकिनी यांच्या गळ्यातील 30 हजाराचे दीड तोळ्याचे गंठण ओरबडले. गंठण ओरबडले त्यावेळी मंदाकिनी यांच्या मानेला झटका बसला.

त्यांनी आरडाओरडा केला असता चोरटे भरधाव वेगात निघून गेले. मंदाकिनी व त्यांच्या मुलीने घडलेला प्रकार तोफखाना पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या