Friday, October 18, 2024
Homeक्राईमअशिक्षितपणाचा फायदा घेऊन वृद्धेचा प्लॉट, जमिनीची केली खरेदी

अशिक्षितपणाचा फायदा घेऊन वृद्धेचा प्लॉट, जमिनीची केली खरेदी

14 जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

वृध्द महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांच्या नावावरील मिळकतीचे खरेदीखत करून घेतले. तसेच खरेदीखतामध्ये दाखविण्यात आलेली 25 लाख 87 हजाराची रक्कम न देता त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. इंदूबाई गोविंद बेरड (रा. भिस्तबाग चौक, सावेडी) असे फसवणुक झालेल्या महिलेचे नाव असून त्या 3 फेब्रुवारी 2023 रोजी मयत झाल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी बहिरू सुर्यकांत उर्फ कांता मगर (वय 35 मूळ रा. जेऊर बायजाबाई ता. नगर, सध्या रा. सेक्टर नंबर 38, खारघर, नवी मुंबई) यांनी बुधवारी (16 ऑक्टोबर) दिलेल्या फिर्यादीवरून 14 जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सदरची घटना 7 ऑक्टोबर 2022 ते 18 नोव्हेंबर 2022 दरम्यान घडली आहे. इंदूबाई बेरड यांच्या गाळ्यात भाडोत्री दुकान असलेला जिशान रशीद सय्यद (रा. गजराजनगर, छत्रपती संभाजीनगर रस्ता, अहिल्यानगर), खरेदीदार मीना नंदू बारस्कर, अमोल नंदू बारस्कर, संकेत नंदू बारस्कर (तिघे रा. सिमला कॉलनी, पंचवटीनगर, भिस्तबाग चौक, सावेडी), ध्येय मल्टीस्टेटचा संचालक राहुल कराळे, मॅनेजर भूषण सुदाम शिंदे (दोघे रा. पोलीस मुख्यालया जवळ, बालिकाश्रम रस्ता), कॅशिअर भारती राजू घाडगे, क्लार्क सागर पाडळे (पत्ता नाही), छत्रपती मल्टीस्टेट अहिल्यानगरचा मॅनेजर रंगनाथ आडसरे (रा. शिवतेज चौक, यशोदानगर, सावेडी), कॅशिअर गायत्री भागवत, ध्येय मल्टीस्टेटचा चेअरमन विशाल भागानगरे, ताबेदार प्रकाश एन. सावंत, अजय डी. गर्जे व निखिल सी. शेकडे (पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी मगर यांची आत्या इंदूबाई बेरड यांच्या नावे भिस्तबाग चौक सावेडी येथे प्लॉट व निंबोडी (ता. नगर) येथे शेत जमीन अशी स्थावर मिळकत होती. त्यांच्या एकटेपणा, वयोवृध्द व अशिक्षितपणाचा फायदा घेत संशयित आरोपींंनी संगनमत करून सदरच्या स्थावर मिळकतीचे खरेदीखत केले. जिशान सय्यद याच्या मदतीने मीना बारस्कर, अमोल बारस्कर, संकेत बारस्कर यांनी सदरची मिळकत खरेदी केली. तसेच खरेदी खतामध्ये दाखविण्यात आलेली रक्कम 25 लाख 87 हजार रुपये त्यांनी इंदूबाई यांना न देता त्यांची फसवणुक केली. दरम्यान, इंदूबाई यांचा 3 फेब्रुवारी 2023 रोजी मृत्यू झाला.

इंदूबाई यांच्या मृत्यूनंतर संशयित आरोपी यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना दमदाटी व मारहाण करून सदर मिळकतीचा बेकायदेशीर ताबा घेतला. खरेदी खतात इंदूबाई यांना दिलेले चेक परस्पर ध्येय मल्टीस्टेटचा संचालक राहुल कराळे, मॅनेजर भूषण शिंदे, कॅशिअर भारती घाडगे, क्लार्क सागर पाडळे, छत्रपती मल्टीस्टेट अहिल्यानगरचा मॅनेजर रंगनाथ आडसरे, कॅशिअर गायत्री भागवत, ध्येय मल्टीस्टेटचा चेअरमन विशाल भागानगरे यांच्या मदतीने संगनमत करून रोख स्वरूपात काढून घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजपुत करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या