Sunday, May 26, 2024
Homeमनोरंजनअक्षय कुमार भगवान शंकराच्या रूपात! OMG 2 टीझर पाहिलात?

अक्षय कुमार भगवान शंकराच्या रूपात! OMG 2 टीझर पाहिलात?

मुंबई | Mumbai

तब्बल अकरा वर्षांनंतर अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच ‘ओएमजी २’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आले होते. आता अखेर या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे. अमित राय दिग्दर्शित ‘ओएमजी २’मध्ये अक्षय कुमार भगवान कृष्णाच्या नव्हे, तर महादेवाच्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाचं कथानक शिव आणि त्याच्या भक्ताभोवती फिरणारं आहे.

- Advertisement -

अक्षय कुमार यावेळी वेगळ्या रूपात दिसतो आहे. भोलेनाथ यांच्या रूपात तो यावेळी या चित्रपटातून समोर येणार आहे. तेव्हा त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना पुन्हा एकदा उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसांपुर्वी अक्षयनं आपल्या या चित्रपटाचे अपडेट दिले होते. त्यानं या चित्रपटाचा पोस्टर प्रसिद्ध केला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यावेळी त्याचा याच रूपातला फोटो पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याच्या लुकचे कौतुक केले होते. त्यातून त्याला या वेषातून लोकांना ओळखणंही कठीण झाले होते. इन्टाग्रामवर अक्षय कुमार यानं हा टीझर पोस्ट केला आहे. तेव्हा या टीझरला मिनिटाचं तूफान लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. एका तासात या टीझरनं लाखो व्ह्यूज मिळवले आहेत. या खाली प्रेक्षकांनीही तूफान कमेंट्स केल्या आहेत. परंतु तुम्ही एक निरीक्षण केलेत का यावेळी परेश रावल नाही तर पंकज त्रिपाठी दिसत आहेत. सोबतच यावेळी यामी गौतमीही दिसते आहे त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

ओएमजी-2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. अक्षय कुमारचा ओएमजी (OMG) हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता. एका मुलाखतीमध्ये अक्षयनं सांगितलं होतं की, ओएमजी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अक्षयनं नॉन व्हेज खाणं बंद केलं होतं. आता 11 वर्षानंतर ओएमजी या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ओएमजी-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अक्षयचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘सेल्फी’ (Selfiee) हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता त्याच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता ओह माय गॉड 2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या