Tuesday, December 3, 2024
Homeजळगावजिल्हा बँकेने वार्षिक अहवालावर संत मुक्ताईं, छत्रपतींचा फोटो टाळला

जिल्हा बँकेने वार्षिक अहवालावर संत मुक्ताईं, छत्रपतींचा फोटो टाळला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती बँकेने (District Central Bank) यंदा प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालावर (Annual reports)प्रथमच संत मुक्ताबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपती द्रोैपती मुर्म (Sant Muktabai, Chhatrapati Shivaji Maharaj and President Droapati Murma) यांचा फोटो (Photo) टाळत प्रदिर्घ परंपरेला छेद दिला आहे. विशेष म्हणजे बँकेचे मानचिन्ह (Bank emblem) म्हणून वापरला जाणारा बँकेच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचा फोटोही (photo of the statue) जाणीवपुर्वक टाळल्याने (avoiding) बँकेबाबत सभासदांमध्ये तीव्र नाराजी (Strong resentment) असून शनिवारी होणार्‍या सभेत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या परिपुर्ण वार्षिक अहवालाची परंपरा यावर्षी मोडीत काढण्यात आली आहे. अहवालाच्या सहा पानांपैकी शेवटच्या एका पानावर बँकेने संपुर्ण संचालकांच्या फोटोच्या भाऊगर्दीत सर्वपक्षीय नेत्यांचे फोटो घेतले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, सोनिया गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, स्थानिक मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील या सर्व नेत्यांचे एकाच ओळीत फोटो आहेत.

प्रमुख नेत्यांच्या फोटोमध्ये आदिवासी समाजातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपती मुर्म यांचा फोटो मात्र वगळण्यात आला आहे. सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रपतींच्या फोटोचा मान पहिला असतो.

बँकेने ंअहवालात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना स्थान दिले तर राष्ट्रपतींचा फोटो छापणे हे नैतिक कर्तव्य होते, परंतु बँकेने राष्ट्रपतींचा फोटो टाळल्याने सभासदांमध्ये नाराजी आहे.

दर्शनी भागातील छत्रपतींच्या पुतळ्याचा फोटोही प्रथमच टाळलं

जिल्हा बँकेची प्रमुख ओळख असलेल्या बँकेच्या मुख्य इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि शेतकर्‍याचे एकत्रित शिल्प दरवर्षी बँकेच्या वार्षिक अहवालाच्या पहिल्या पानावर आवर्जुन घेतले जाते. यावर्षी बँकेने छत्रपतींचा पुतळा टाळून बँकेचे केवळ प्रवेशद्वाराचा फोटो असलेले छायाचित्र पहिल्या पानासाठी निवडले आहे.

बँकेच्या प्रदिर्घ परंपरेत प्रथमच या शिल्पाशिवाय बँकेच्या प्रवेशद्वाराचा फोटो छापण्यात आला आहे. या प्रकारामुळे यावर्षी सभासदांमध्ये कमालीचा संताप आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या संत मुक्ताबाई यांचा फोटोही यावर्षी अहवालाच्या पानावरून काढून टाकण्यात आलेला आहे.

बँकेने राष्ट्रपुरूष, संत आणि राष्ट्रपतींच्या फोटोवरून बँकेवर टिका होत आहे. शनिवारच्या सभेत या विषयावरून संचालक मंडळाला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या