Saturday, April 26, 2025
Homeधुळेएलसीबी अ‍ॅक्शन मोडवर, दोन गुन्ह्याचा छडा

एलसीबी अ‍ॅक्शन मोडवर, दोन गुन्ह्याचा छडा

धुळे । dhule प्रतिनिधी

येथील स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) (LCB) अ‍ॅक्शन मोडवर (action mode) असून त्यांच्या पथकाने दोन गुन्ह्यांचा (two offense) छडा (Investigation) लावला आहे. जुन्या चावीच्या मदतीने चिमठाणा गावातून ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरी करणार्‍या चोरट्याला साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. तर साक्री रोडवरील विद्युत महामंडळाच्या पोलवरून सी चॅनेल चोरीप्रकरणातही दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडूनही 53 हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले. एलसीबीच्या या कामगिरीचे वरिष्ठांनी कौतूक केले आहे.

- Advertisement -

मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन असणार्‍यास पाचपट पाणीपट्टीसातपुडा भागात वन्य प्राण्यांची अवस्था बिकट

शहरातील साक्री रोडवरील विद्युत महामंडळाच्या पोलचे सी चॅनल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. ही चोरीची घटना दि. 13 मे रोजी रात्री साडेनऊ वाजे पुर्वी घडली. याबाबत वायरमन वासुदेव अरूण मालचे (रा. गोदाई कॉलनी, साक्रीरोड, धुळे) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर धुळे तालुका पोलिसा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही चोरी फजलु रहेमान अन्सारी (रा.ग.नं.14 घडीयालवाली मशिद, धुळे) व अब्दुल बारी अब्दुल शकुर अन्सारी (रा.ग.नं. 5, घडीयालवाली मशिद मागे, धुळे) यांनी केली असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.

VISUAL STORY : परिणीती चोप्राने केली नव्या आयुष्याची सुरूवात, भर कार्यक्रमातील ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष मोटारसायकलला ट्रकची धडक : एक ठार

त्यानुसार निरीक्षक पाटील यांनी पथकास कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार शहरातील ऐंशी फुटी रोड परिसरात शोध घेतला असता वरील दोन्ही इसम एम. एच. 18/ एन 7178 रिक्षा बाळगुन त्यात सी चॅनल घेऊन जाताना मिळून आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरीचे सी चॅनल हे भंगार बाजारात विक्रीसाठी वाहतूक करीत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 50 हजारांची रिक्षा, 2 हजार रूपये किंमतीचे दोन लोखंडी सी चॅनेल, एक हजार रूपये किंमतीचा पोलवरील स्वीच हॅण्डल असा एकूण 53 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?कोण होणार अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ?जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

तसेच दुसर्‍या कारवाईत एलसीबीच्या पथकाने शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणा गावातून दि.6 ते 7 मे दरम्यान एम.एच.18/झेड 4841 क्रमांकाचे चोरी झालेले ट्रॅक्टर न्याहळोद येथून चोरट्यासह ताब्यात घेतले. राहुल बाबुराव पाटील (रा. चिमठाणे ता. शिंदखेडा) यांच्या मालकीची ट्रॅक्टर-ट्रॉली दि.6 ते 7 मे दरम्यान मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दि. 9 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिस निरिक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने अजय ऊर्फ गणेश आसाराम कोळी (18 वर्षे 3 महिने) रा. देगाव, ता. शिंदखेडा यास पथकाने न्याहळोद गावातील चौकातून ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले.

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

चौकशीत त्याने पैशांची अडचण असल्याने चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, तपासात अजय कोळी याने ट्रॅक्टर चोरीव्यतिरिक्त इतरही गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामुळे इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

त्यांच्याकडून साडेचार लाखांचे ट्रॅक्टर (क्र.एमएच 18 झेड 4871), 4 हजारांचे चादीचे दोन हजारांचे पायातील बेले, साडेनऊ हजारांची रोकड असा एकूण 4 लाख 65 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

0
नाशिक | Nashik नाशिकचा संदर्भकोष अशी अभिमानास्पद ओळख प्राप्त केलेले मधुकर झेंडे (Madhukar Zende) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन (Passed Away) झाले. मृत्यसमयी ते...