Saturday, July 27, 2024
Homeनाशिकभाजपातर्फे सेवा पंधरवडानिमीत्त विविध कर्यक्रम

भाजपातर्फे सेवा पंधरवडानिमीत्त विविध कर्यक्रम

नाशिक | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक महानगर भाजपातर्फे सेवा पंधरवडानिमीत्त विविध कर्यक्रम आयोजीत केलेे. महाराष्ट्र प्रदेश भाजप उपाध्यक्ष व नाशिक महानगर व नाशिक ग्रामीण प्रभारी राजेंद्र गावित यांनी आज नाशिक महानगर भाजपाच्या नूतन कार्यकारणीच्या व पदाधिकार्‍यांच्या पहिल्याच बैठकीत मार्गदर्शन केलेे.

- Advertisement -

भाजप नाशिक महानगराचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. दि.१७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोंबर कालावधीत सेवा पंधरवड्याचे विविध सेवा कार्यक्रमांनी युक्त असे कार्यक्रमाचे आयोजन व्हावे यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, लोकसभा समन्वयक गिरीश पालवे, नाशिक महानगर भाजपा उपाध्यक्ष पवन भगूरकर, नाशिक महानगर सरचिटणीस सुनील केदार, हिमगौरी आडके,रोहिणी नायडू, त्तम उगले, श्याम बडोदे ,काशिनाथ शिलेदार उपस्थित होते.

जाधव यांनी या सेवा पंधरवड्यातील कार्यक्रमांची माहिती देताना सांगितले की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सप्ताहात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे व कार्यक्रम प्रमुखांचे नावे त्यांनी यावेळी जाहीर केली.

युवा मोर्चातर्फे रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठीच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी वस्ती संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर दि.२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त व्यापक प्रमाणात स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या महापुरूषांचे पुतळे तसेच परिसर स्वच्छ करण्याचे कार्यक्रम ही होणार आहेत. आयुष्यमान भव सप्ताहानिमित्त गरजू जनतेकरिता आयुष्मान कार्ड वाटप तसेच नोंदणी कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे. या पंधरवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, विकासाची दृष्टी, धोरणे आणि त्यांना मिळालेले यश या विषयावरील प्रदर्शनीही आयोजित केली जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले ९ वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. सेवा,सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष संघटनेकडून त्यांचा सेवाभाव विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

दि.२६ सप्टेंबर ते दि.१ ऑक्टोबर या काळात बूथ सशक्तिकरण अभियानाच्या दुसर्‍या टप्प्याचा व्यापक पद्धतीने प्रारंभ करावा. दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी पं.दीनदयाल उपाध्याय जयंती दिन असल्याने बूथ स्तरावरील कार्यक्रमांतर्गत विधानसभेतील प्रत्येक बुथवर पं.दीनदयाल यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या जीवनावर व्याख्यानाचे आयोजन करावे.

दि. २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त आपापल्या परिसरातील विधानसभा क्षेत्रातील स्वातंत्र्य सेनानी व महापुरुषांच्या पुतळ्यांचे आवारातील परिसराची स्वच्छता करून सुशोभीकरण करावे करावे.

सावजी म्हणाले की नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था लोकसभा व विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे माध्यमातून मंजूर झालेल्या जनहिताच्या योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे हे सर्व करत असताना या योजनेची पुरेपूर माहिती लाभार्थींना द्यावी.

लोकसभा समन्वयक गिरीष पालवे यांनी नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व सेवा पंधरवड्यातील नियोजित कार्यक्रम प्रभावीपणे कसे होतील यासाठी हे कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी स्वतःला झोकुन घ्यावे असे सांगितले. सूत्रसंचालन पवन भगूरकर यांनी केले. तर प्रास्ताविक सुनील केदार यांनी केले तर आभार हिमगौरी आडके यांनी मानले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या