Monday, May 27, 2024
Homeनाशिकशहा सोसायटीवर आ. कोकाटे गटाची सत्ता

शहा सोसायटीवर आ. कोकाटे गटाची सत्ता

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील शहा येथील विकास सोसायटीच्या निवडणुकीत (election) आमदार माणिकाराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) समर्थक माजी चेअरमन आबासाहेब जाधव (Former Chairman Abasaheb Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखालील श्री काल भैरवनाथ पॅनलने 12 जागांवर विजय मिळविला.

- Advertisement -

विरोधी संभाजी जाधव यांच्या लोकविकास पॅनलसह माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Vaje) गटाच्या कालभैरवनाथ शेतकरी (farmers) पॅनलला सपाटून पराभव पत्करावा लागला. प्रथमच तीन पॅनल निवडणूक रिंगणात होते. वाजे गटाच्या कालभैरवनाथ शेतकरी पॅनल व लोकविकास पॅनलचा पराभव आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची (election) समीकरणे बदलणारा ठरु शकतो अशी चर्चा आहे.

सर्वसाधारण गटात दगू अदिक, रामनारायण कलंत्री, आबासाहेब जाधव, अण्णासाहेब जाधव, बाळू जाधव, नवनाथ जाधव, शाम मस्के, नवनाथ वाकचौरे विजयी झाले. सुवर्णा लोखंडे, अरुणा सोनवणे महिला राखीव गटातून निवडून आल्या तर हर्षदा जाधव इतर मागास प्रवर्गातून जिंकल्या. भटक्या जाती-जमाती गटातून विद्यमान चेअरमन संजय गोराणे विजयी झाले.

निवडणूक अधिकारी म्हणून एकनाथ पाटील, सचिव पवन नरोडे यांनी काम पाहिले. साहेबराव जाधव, दामोदर जाधव, सीताराम जाधव, कैलास आदिक, शरद जाधव, सोमनाथ जाधव, भाऊसाहेब जाधव, रवींद्र जाधव, सरपंच सुदेश जाधव, रमेश सैंदर यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. समर्थकांनीं गुलालाची उधळण करत, फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.

बाळू जाधव बिनविरोध

अनुसूचित जमाती गटातून तीन उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्याने लोकविकास पॅनलचे बाळू जाधव बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे 12 जागांवर निवडणूक लढविण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या