Saturday, July 27, 2024
Homeनगरमहापालिकेतील ‘पांढर्‍या हत्तीं’चा चांदबिबी महालावर होणार कडेलोट... संघटना का आक्रमक?

महापालिकेतील ‘पांढर्‍या हत्तीं’चा चांदबिबी महालावर होणार कडेलोट… संघटना का आक्रमक?

अहमदनगर | प्रतिनिधी

शहरात (Ahmednagar City) सार्वजनिक जागा व रस्त्यांवर अतिक्रमण (Encroachment) करणार्‍यांना अभय देणार्‍या महापालिका अधिकार्‍यांचा (Municipal Officer) पीपल्स हेल्पलाईन (People’s Helpline), भारतीय जनसंसद (Bharatiy Jansansand) व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पूर्व संध्येला चांदबिबी महालावर (Chandbibi Mahal) कवठी कडेलोट केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी (Adv Karbhari Gawli) यांनी दिली.

- Advertisement -

आरटीपीसीआरची गती… 450 दिवसात 5 लाख

महापालिकेचा (Ahmednagar Municipal Corporation) कारभार काँक्रीट जंगलराज पद्धतीने चालत असून, अधिकारी पांढरे हत्तीप्रमाणे वागत आहे. सर्वसामान्यांची महापालिकेत कामे होत नसून, टोळवाटोळवी केली जात आहे. भ्रष्टाचारामुळे महापालिकेत अनागोंदी माजली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक जागा व रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून, देखील ते पक्के अतिक्रमण काढण्यास महापालिका असमर्थ ठरत आहे. याला आयुक्त शंकर गोरे, मनपा अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे व नगररचनाकार कल्याण बल्लाळ जबाबदार आहे.

या अधिकार्‍यांचा निषेध नोंदविण्यासाठी त्यांच्या प्रतिकात्मक छायचित्र असलेल्या फलक चांदबिबी महालावरुन फेकून कडेलोट केला जाणार आहे. तर त्यांच्या प्रतिमा समोर काटेरी बुके ठेवण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. हा कार्यक्रम नगरकरांना पाहण्यासाठी फेसबुक लाईव्ह केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या