Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रShivrajyabhishek Din 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तीन मोठ्या घोषणा

Shivrajyabhishek Din 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तीन मोठ्या घोषणा

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Sohala) यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर (Raigad) भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी संबोधित केले. त्यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच राज्यासाठी मोठ्या घोषणाही केल्या आहेत…

- Advertisement -

मुंबईतील कोस्टल (Mumbai Costal Road) रोडला छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिवसृष्टीसाठी (Shivsrushti) ५० कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

“शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य, सुशासन…”; शिवराज्याभिषेक दिनाच्या PM मोदींनी दिल्या मराठीतून शुभेच्छा

महिलांसाठी अनेक योजना सुरु करुन महिलांना सन्मान दिला आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर देण्यात येणार असल्याचे ही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जनकल्याणाचा शिवसंकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस असून शिवरायांच्या कल्पनेतील सुराज्य आणणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Shivrajyabhishek Din 2023 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह, हजारो शिवभक्तांची उपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद आहे. म्हणूनच आपण राज्यकारभार करत आहोत. शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले. आपण पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत आहे. हे सरकार सर्वसामान्यांच सरकार म्हणून काम करत आहे. आज शिवछत्रपतींसाठी गडकोट किल्ले हे जीव की प्राण होतं. यासाठी सरकार काम करत आहे. यासाठी आज मी जाहीर करतो प्रतापगड प्राधिकरण सुरू करत आहोत. प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे यांनी करावे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

“आज लंडनच्या संग्राहलयात असलेल्या भवानी तलवार आणि वाघनख भारतात परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तेही लवकरच आपल्या महाराष्ट्रात येईल असेही शिंदे म्हणाले. तसेच रायगडावर शिवसृष्टीसाठी ४५ एकर जागा आहे, त्याला निधी द्या अशी मागणी आमदार भरत गोगावलेंनी केली होती. मी आताच त्याासाठी ५० कोटींचा निधी जाहीर करत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), छत्रपती उदयनराजे भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar), उदय सामंत (Uday Samant) यांच्यासह शेकडो मंत्री आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या