नाशिक | प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मदत फाउंडेशन तर्फे गणेशोत्सव काळात भव्य इन्स्टाग्राम रिल्स स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असल्याचे युवा शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सवास सुरवात होत असून सर्वांकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मदत फाउंडेशन तर्फे भव्य इन्स्टाग्राम रिल्स स्पर्धा या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
लोकांपर्यंत पोहोचण्याचं, एखाद्या विषयावर व्यक्त होण्यासाठी ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम हे सोशल मिडिया मधील सर्वोत्तम माध्यम बनलं आहे. तसेच परिसरात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबाबत रील्सच्या माध्यमातून प्रबोधन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे.
Video : नाशकात मराठा समाजाकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
इन्स्टाग्राम रिल्स बनविण्याचे १९ सप्टेंबर म्हणजेच श्री गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जना पर्यंत असणार आहे. रिल्स बनवताना त्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मदत फाउंडेशन नाशिक गणेशोत्सव असे नाव असणे अनिवार्य आहे. रिल्स बनविल्यानंतर अंबादास खैरे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला टॅग व कोलाब्रेशन करणे आवश्यक आहे.
सर्वाधिक व्ह्युज आणि लाईक असलेल्या रिल्सला अनुक्रमे बक्षिसे देण्यात येणार आहे. यात प्रथम पारितोषिक ६ हजार ६६६ रुपये , द्वितीय पारितोषिक ५ हजार ५५५ रुपये , तृतीय पारितोषिक ३ हजार ३३३ रुपये तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या गणेशवाडी, पंचवटी येथील कार्यालयावर संपर्क करून जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले आहे.