Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडागुरू पौर्णिमेच्या निमित्ताने सचिनने मानले ’या’ तीन गुरुंचे आभार

गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने सचिनने मानले ’या’ तीन गुरुंचे आभार

मुंबई –

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिनने आपल्या जीवन प्रवासात मदत करणार्‍या तीन गुरूंचे आभार मानले.

- Advertisement -

व्हिडिओमध्ये सचिनने सांगितले, ’’गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने मी माझ्या तिन्ही गुरूंचे आभार मानतो. जेव्हा मी बॅट हातात घेतो, तेव्हा माझ्या मनात या तीन लोकांची नावे येतात, ज्यांना माझ्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. मी आज जे काही आहे ते फक्त या तीन लोकांमुळे आहे.’’

सचिन म्हणाला, ’’सर्वप्रथम माझा भाऊ अजित तेंडुलकर ज्याने मला आचरेकर (रमाकांत) सरांकडे नेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी फलंदाजीला जात असे, त्यावेळी माझा भाऊ माझ्यासोबत नसला, तरीही तो नेहमीच माझ्याबरोबर मानसिकरित्या असायचा. माझे दुसरे गुरू रमाकांत आचरेकर सर. त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकतो. त्यांनी माझ्या फलंदाजीत झालेल्या सर्व चुका लक्षात घेतल्या. त्यानंतर ते यावर तासन् तास बोलत असायचे आणि मला समजावून सांगायचे.’’ सचिनचे प्रशिक्षक असलेले रमाकांत आचरेकर यांचे गेल्या वर्षी निधन झाले.

सचिनने आपल्या वडिलांना तिसरे गुरू म्हटले आहे. तो म्हणाला, ’शेवटी माझे वडील. ते नेहमी सांगायचे, की कधीच शॉर्टकट घेऊ नका. स्वत: ला चांगले तयार करा. या सर्वांच्या शेवटी कधीही आपली मूल्ये खाली येऊ देऊ नका.’’

सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळत अनेक विक्रम पादाक्रांत केले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : पानिपत येथे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपत येथील कालाआंब परिसरात एक स्मारक (Memorial) उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis...