Wednesday, October 16, 2024
Homeनाशिकऋषी पंचमी निमित्त कावनई येथील कपिलधारा तीर्थावर महिला भाविकांची स्नानासाठी अलोट गर्दी

ऋषी पंचमी निमित्त कावनई येथील कपिलधारा तीर्थावर महिला भाविकांची स्नानासाठी अलोट गर्दी

घोटी | प्रतिनिधी

इगतपूरी तालूक्यातील कावनई (Kavanai) येथील कपिलधारा (Kapildhara Tirtha) येथील प्रसिध्द तीर्थक्षेत्री शिवमंदिर व राममंदिरात ऋषी पंचमी निमित्त स्नानासोबत शिव पुजनासाठी भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळत आहे. अधिक मास नंतर आता ऋषी पंचमी निमित्त (RushiPanchami) हजारो भक्त महिला भाविकांनी स्नानाचा व शिव दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती विश्वस्त कुलदीप चौधरी यांनी दिली.

- Advertisement -

यावेळी मंदिराचे महंत रामनारायण दास फलहारी महाराज व पुरणचंद्र दास उडिया महाराज उपस्थित होते. कपिलधारा तीर्थक्षेत्र या ठिकाणी फार प्राचीन काळापासून कुंभमेळ्याची सुरूवात होत असल्याने हे शिवतीर्थ व राम मंदिर प्रसिध्द आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी फार मोठी यात्रा भरते.

Nashik News : जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा बंद; व्यापारी संपावर, ‘हे’ आहे कारण

भाद्रपद महिन्यातील तृतीया अर्थात हरितालिका पूजनानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. आणि भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही महिला करतात. या व्रताअंतर्गत दरवर्षी महिला पुजा व स्नानासाठी या तीर्थावर येतात.

ऋषींबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी ऋषी पंचमी सण साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीत कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्री व वशिष्ठ या सात ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या प्राचीन कपिलधारा तीर्थावर ऋषीपंचमी साजरी करण्यात येते.

लालबागच्या राजाचरणी पहिल्याच दिवशी लाखोंचं दान! नोटांच्या माळा, सोन्याचे दागिने लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण

काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे यांनी या ठीकाणी पोलीस पथकासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या