Wednesday, September 11, 2024
Homeनाशिकखाजगी वाहनांना गडावर जाण्यास मज्जाव

खाजगी वाहनांना गडावर जाण्यास मज्जाव

वणी | प्रतिनिधी

शक्तीच्या साडेतीन पिठा पैकी अर्धे पिठ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सप्तश्रृंग गडावरील नवरात्र यात्रा उत्सवास आजपासून सुरवात होत आहे. खाजगी वाहनांना गडावर जाण्यास मज्जाव करण्यात आला असून राज्य मार्ग परीवहन महामंडळाने भाविकांना वाहतूक सुविधा देण्यासाठी एस. टी. बसेसची मुबलक प्रमाणात व्यवस्था करण्यात आल्याची माहीती विभाग प्रमुख अरुण सिंहा यांनी दिली.

- Advertisement -

रविवार दि.१५ पासुन सुरू होणाऱ्या या यात्रा उत्सव काळात नांदुरी येथे व सप्तश्रृंग गडावर तात्पुरत्या वाहन तळाची निर्मिती करण्यात अली असून या दोन्ही ठिकाणी पिण्याचे पाणी तसेच फिरते स्वच्छता गृहाची व्यवस्था एस. टी. महामंडळाकडून करण्यात आली आहे.

नांदुरी येथून गडावर जाण्यासाठी १०० एस.टी. बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे आगार प्रमुख संदीप बेलदार यांनी दिली. नाशिक येथून थेट सप्तश्रृंग गडावर जाण्यासाठी ६० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पहिल्या ते चौथ्या माळेपर्यंत १०० बसेस त्यानंतर १५० बसेस तर ७ व्या माळेपासून २२५ बसेस उपलब्ध करुण देणार असल्याचे वाहतूक निरिक्षक सुरेश पवार यांनी सांगितले. त्याच प्रमाणे जिल्हयातील प्रत्येक अगारातून थेष्ट सप्तश्रृंग गडावर जाण्यासाठी एस.टी. बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकान सुखकर व सुरक्षीत प्रवास देण्यासाठी एस.टी. महामंडळाने तयारी केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या