Tuesday, April 29, 2025
Homeमुख्य बातम्या... तर ते ब्रम्हांडही चालवतील; उद्धव ठाकरेंची मिश्कील टिप्पणी

… तर ते ब्रम्हांडही चालवतील; उद्धव ठाकरेंची मिश्कील टिप्पणी

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

मिंधे म्हणतात की नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणजे सूर्य… त्यांच्यावर थूंकू नका, अरे मग तुमचा सूर्य तिकडे मणिपूरमध्ये का उगवत नाही? तिकडे का प्रकाश पाडत नाही? अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. नरेंद्र मोदींनी जर करोनाची लस बनवली असेल तर ते ब्रम्हांडही चालवतील अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली…

- Advertisement -

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद हॉलमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.५७ वर्षांपूर्वींच्या शिवसैनिकांचा जोश अजूनही कायम आहे. इथ आपल्या मेळाव्याला गर्दी झाली असून नेस्को सेंटरमध्ये गारदीची टोळी जमली आहे, असा टोला ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

मान्सूनची वाट बघावीच लागणार

उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतानंा म्हणाले की. मणिपूर पेटले असताना आपले पंतप्रधान अमेरिकेत चालले आहेत. हे बोलल्यानंतर नवगुलाम बोलले, सूर्यावरती थूंकू नका. मग ते जर सूर्य असतील तर मणिपूरमध्ये प्रकाश का पाडत नाही? मणिपूरमध्ये कायद्याचे राज्य राहिले नाही. एका रिटायर्ड अधिकार्‍याने सांगितले की मणिपूरमध्ये लिबियासारखी परिस्थिती झाली आहे. त्या ठिकाणी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळले जात असताना भाजपचे नेते तिकडे जात नाहीत.

देवेंद्र फडणवीवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, काल देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातील हास्यजत्रेचा प्रयोग केला. कोविडची लस मोदीजींनी तयार केली,मग बाकीच्या कंपन्या काय गवत उपटत बसल्या होत्या का? त्यांच्या हास्यजत्रेत अवली सगळीच आहेत, लव्हली कुणीच नाही.याला जनता कावली आहे. मोदी हे विश्वगुरूंचे विश्वगुरू. लस त्यांनी बनवली असली तर नक्कीच ब्रम्हांडही चालवतील.

उद्धव ठाकरे म्हणाले की, जे भाडोत्री किंवा बिकाऊ असतील त्यांना घेऊन जायचे तर जा. कारण रोज फोन चालू आहेत…काय करता या ना. चांगलं स्वाभिमानाचे, जिद्दीचे, निष्ठेचे हे शिवसेनाप्रमुखांनी दिलेले बियाणे आहे. हा उद्धव ठाकरे एकटा नाही तर समोर बसलेले सगळे उद्धव ठाकरे आहेत. पीक कापून नेले मात्र शेती आमच्याकडे आहे.

जाहिरातीवरच जास्त खर्च

ठाकरे म्हणाले की,जाहिरातीवर जेवढा खर्च करता तितका पैसा जर शेतकर्‍यांना दिला असता तर शेतकर्‍यांना फायदा झाला असता. हे आल्यानंतर पाऊस लांबणीवर चालला आहे. पाऊस लवकर येऊ दे. बळीराजावर संकट येऊ देऊ नको अशी देवालाच प्रार्थना करावी लागेल. कारण हे बळीराजाला मदत करणार नाही. यांचा जाहीरातीवरच जास्त खर्च चालला आहे

भारतातून बँकॉकला जाता येणार बायरोड; कधीपासून सुरु होणार महामार्ग?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....