धुळे Dhule । प्रतिनिधी
दिवाळी सुट्टीत (Diwali vacation) गावीत आलेले (Came to the village) चाकरमानी (Chakarmani) आता आपआपल्या शहरात (Returning to the city) परतत आहेत. त्यामुळे एसटीच्या मध्यवर्ती आगारात(CENTRAL AGAR OF ST) मोठी गर्दी (big crowd) होत आहे. सर्वच बस हाऊसफुल्ल (Bus house full) भरून जातांना दिसत आहेत. या गर्दीवर नियंत्रणासह आगारात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कर्मचार्यांना देखील मोठी कसरत करावी लागत आहे.
एसटीत दिव्यांग, लहान बालके, वृद्धांना सवलत लागू असल्यामुळे परतीच्या प्रवासासाठी खासगी वाहतूक पेक्षा एसटीलाच नागरिकांची अधिक पसंती आहे. परतीच्या प्रवासात मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा, इंदूर, बर्हाणपूरकडे जाणार्या बसेसमध्ये गर्दी आहे. तसेच चोपडा, जळगाव, औरंगाबाद, चाळीसगाव, नाशिक, मुंबई, पुणे या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या आहे.
जादा प्रवासी संख्या असलेल्या या मार्गावर जादा बसेस सोडण्यात येत आहेत. शहरातील मध्यवर्ती आगारातून नाशिक येथे नियमित बससेवेसह, विना वाहक, बायपास सेवा देखील सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने विविध मार्गावर जादा बसेस सोडल्या आहेत. तसेच खासगी प्रवासी वाहतूकदारांनाही सुगीचे दिवस आहेत. सध्या खासगी प्रवासी वाहतूकदारांचे दर वाढलेले आहेत.