Saturday, May 4, 2024
Homeनगरराहुरी कृषी विद्यापीठात नोकरीच्या आमिषाने दोघांना साडे सहा लाखांना गंडा

राहुरी कृषी विद्यापीठात नोकरीच्या आमिषाने दोघांना साडे सहा लाखांना गंडा

जळगाव – अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात कारकून म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगत एका भामट्याने दोघांकडून साडे सहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे. याप्रकरणी दीपक बापू जाधव (रा. वासखेडी, ता. साक्री, जि.धुळे) याला शनिपेठ पोलिसांनी आज मंगळवारी अटक केली.

वंदना अशोक मराठे उर्फ वंदना सचिन बुचडे (वय 31, रा.जोशी पेठ, जळगाव, ह.मु.मुंबई) यांनी तसेच त्यांचे चुलत भाऊ वाल्मीक सुरेश पाटील यांनी दीपक जाधव याला 2018 व 2018 या दोन वर्षात 6 लाख 40 हजार 100 रुपये वेळोवेळी दिलेले आहेत. काही रक्कम बँक खात्यात तर काही रक्कम ऑनलाईन वर्ग केली.

- Advertisement -

राहुरी कृषी विद्यापीठात दोघांना लिपिक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष जाधव याने दिले होते, तीन वर्षात त्याने ना नोकरीला लावले ना पैसे परत केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वंदना यांनी शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार जाधव याच्याविरुद्ध सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या