Saturday, April 26, 2025
Homeनंदुरबारगावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

नंदुरबार । प्रतिनिधी । Nandurbar

नंदुरबार शहरातील बसस्थानकाजवळ गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

दि.30 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या साई प्लाझा येथे दीपक मनोजभाई यादव (रा.कांदीवली इस्ट मुंबई, हल्ली सुरत) हा विना परवाना गावठ बनावटीची पिस्टल व जिवंत काडतूस बाळगतांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून 15 हजाराचे गावठी पिस्टल व 600 रुपये किमतीचे एक काडतूस जप्त करण्यात आले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोशि विशाल मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या