नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एका गांजा (Ganja) डिलर महिलेने पुण्यातून (Pune) ऑनलाईन बुक केलेली उबर कॅब (कार) चालकास (Driver) भारतनगर येथे हाॅल्टिंग चार्चेज देण्याचे कबुल करुन थांबविली. त्यानंतर महिला बाहेर पडली असता, मुंबई नाका पाेलिसांच्या (Mumbai Naka Police) गस्तीपथकाने संशयावरुन कारची तपासणी केली असता, तिच्यात चार लाख रुपयांचा १९ किलाे गांजा मिळून आला. याबाबत महिलेसह इतर तिघांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित महिलेचा शाेध घेतला जात आहे.
हे देखील वाचा : नाशिकमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अॅण्ड रन
याबाबत अधिक माहिती अशी की, किरण गोविंद धुमाळ (३२, रा. पुणे) अटक करण्यात आलेल्या संशयित (Suspected) कारचालकाचे नाव आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे अंमलदार विजय म्हैसधुणे, भास्कर सदगीर यांना भारतनगर चौफुलीवर इर्टिका कार सोमवारी (दि. ८) सकाळी बराच वेळेपासून उभी असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अशाेक गिरी यांना कळविली. त्यांच्या निर्देशाने गस्तीपथक व गुन्हेशोध पथकाने घटनास्थळी जात इर्टिका कारची (एमएच १२ डब्ल्युआर ५२६२) झडती घेतली. तेव्हा, कारमध्ये बॅगा आणि गोण्या आढळल्या. त्या उघडल्या असता त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : ओळखीचा फायदा घेत तीन काेटींचा गंडा; पाच गुन्हे नाेंद
दरम्यान, पोलिसांनी (Police) संशयित कारचालक धुमाळ यास ताब्यात घेत अटक केली. तसेच कार जप्त करीत १९.३७ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख हे तपास करीत आहेत. संशयित महिलेसोबत बॅगेसह पोत्यांमध्ये असलेल्या सामानाची कोणतीही शहनिशा न केल्याने अन् हॉल्टींग चार्जच्या आमिषाला बळी पडल्याने कारचालक मात्र नाहक या गुन्ह्यात अडकला गेला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : भाईगिरी करताे म्हणून काढला काटा
डिलरचा शाेध सुरु
संशयित पूजा संजय मिसाळ नावाच्या महिलेने ऑनलाईन पद्धतीने उबर ॲपवरून कारचालक धुमाळ याची कार नाशिकला येण्यासाठी बुक केली होती. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ते भारतनगर चौफुलीवर पोहोचले. त्यावेळी संशयित महिला व तिच्या समवेत आणखी एक इसम यांनी कारचालकाला हॉल्टिंग चार्ज देण्याचे आमिष दाखवून थोड्यावेळात येतो म्हणून निघून गेले, असे समोर आले आहे. त्यावरून पोलीस संशयित महिलेचा शोध घेत आहेत. तर हा गांजा कुठे नेला जात हाेता, ताे वडाळागावातील मुख्य सूत्रधाराकडे पाेहाेच करावयाचा हाेता का याचा तपास सुरु आहे.
व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा