चोपडा Cōpaḍā । प्रतिनिधी
शिरपूर पोलिसांनी Shirpur police गावठी कट्ट्या Gawthi Kattya प्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपीला घेऊन तपासासाठी मध्यप्रदेशात गेलेल्या ग्रामीण पोलिसांच्या पथकाने उमर्टी शिवारातील Umarti Shivara शेतात फिरणार्या संशयिताकडून चार गावठी कट्ट्या सह जिवंत काडतुसे असा 1,07,000/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह एकास अटक केली आहे तर या घटनेने चोपडा व शिरपूर तालुक्यात प्रचंड खडबळ उडाली असून,ग्रामीण पोलिसांच्या Rural Police धडक कारवाईचे जनतेने स्वागत केले आहे.
शिरपूर पोलिसांनी गावठी कट्ट्या प्रकरणी एका आरोपीस अटक केली असून, सदर गुन्ह्या च्या अधिक तपासासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांचे कडे मदत मागितली.त्यानंतर शिरपूर पोलिसांचे पथक संशयित आरोपीला घेऊन चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल झाले.
यावेळी त्यांच्या सोबत ग्रामीण पोलिसांचे पथक मध्यप्रदेशातील पारच्या उमर्टी गावात पोहचले असता तेथे काहीच मिळून आले नाही परंतू पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलिसांच्या पथकाने चोपडा तालुक्यातील उमर्टी शिवारातील शेतात धडक दिली यावेळी पथकातील कर्मच्यांना शेतातील झोपडी जवळ एक जण संशयितपणे फिरतांना आढळून आला.पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून नाव गाव विचारले असता त्याने सुलेद्रसिंग प्रितमसिंग बर्नाला (वय-20) रा.पारची उमर्टी ता. वरला जि. बडवानी मध्यप्रदेश असल्याचे सांगितले.
यावेळी त्यास झोपडीत घेऊन जाऊन पत्री कोठीची झाडाझडती घेतली असता त्यात एक निळ्या रंगाची थैली मिळून आली पोलिसांनी पिशवीची तपासणी केली यावेळी त्यात एक लाख रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे चार कट्टे,साठ हजार रुपये तर दोन हजार रुपये किंमतीचे तीन लोखंडी मॅगेझीन व एक हजार रुपये किंमतेचे एक लहान लोखंडी मॅगेझीन असा 1,07,000/- रुपये किंमतीच्या मुद्देमाल मिळून आला.
या प्रकरणी पो.ना. शशिकांत हिरालाल पारधी यांच्या फिर्यादी वरून ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपीस अटक करण्यात आली आहे.पुढील तपास ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.