Friday, May 16, 2025
Homeधुळेधुळयात गुंगीकारक औषध साठ्यासह एकाला अटक

धुळयात गुंगीकारक औषध साठ्यासह एकाला अटक

धुळे – प्रतिनिधी dhule

- Advertisement -

गुगीकारक औषधांचा (medicine) साठा करणार्‍या एकाला आझादनगर पोलिसांनी (police) रंगेहात पकडले. त्याच्याकडून 47 हजारांचा साठा जप्त करण्यात आला.

Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्रीVideo गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

शहरातील हमाल मापाडी सोसायटीत काल सायंकाळी ही छापा कारवाई करण्यात आली. नितीन पुंडलीक मुकूंदे (रा. हमाल मापाडी प्लॉट, धुळे) असे त्याचे नाव आहे. त्याने राहत्या घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक औषधांचा साठा करून त्यांची बेकायदेशीर विक्री करीत असल्याची गुप्त माहिती आझादनगर पोलिसांना मिळाली होती.

Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

त्यानुसार पथकाने सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास छापा टाकला. घराची झडती घेतली असता 47 हजार 300 रुपये किंमतीच्या रेक्सॉन टी सिरपच्या 440 औषधाच्या बाटल्या मिळून आल्या.

Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

पोकॉ सिध्दांत मोरे यांच्या फिर्यादीवरुन आझादनगर पोलिसात नितीन मुकूंदेविरोधात एनडीपीस अ‍ॅक्ट कलम 20 व 22 सह भांदवि कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सहा पोलीस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, सपोनि दीपक पावरा, हेकाँ प्रकाश माळी, पोना संदिप कढरे, योगेश शिंदे, पोकॉ शोहेब बेग, आतिक शेख, एस.एन.मोरे, एस.पी. शेंडे, हरीष गोरे, संतोष घुगे व समाधान पाटील यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील हे करीत आहेत.

Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...