Saturday, May 4, 2024
Homeनाशिकअवैध वृक्षांची कत्तल करणारा 'पुष्पा' गजाआड

अवैध वृक्षांची कत्तल करणारा ‘पुष्पा’ गजाआड

इगतपुरी | Igatpuri

तालुक्यात शेकडो अवैध वृक्षांची कत्तल (Tree felling) करून वाहतूक (Transport) करणाऱ्या ट्रकचालकास वनविभागाने (Forest Deparment) रंगेहात पकडले आहे. या ट्रकमध्ये सुमारे २६ टन लाकूड हस्तगत करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) गेल्या काही दिवसांपासून शेकडो अवैध झाडांची कत्तल करून वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी वनपरिक्षेत्र हद्दीत असलेल्या वासाळी फाटा येथे ट्रक क्रमांक एमएच 12 एचडी 7856 हा सिन्नरच्या (Sinnar) दिशेने जात असताना या ट्रकला अडविण्यात आले.

ट्रक चालकाकडे परवान्याची मागणी केली. मात्र त्याच्याकडे परवाना नसल्याने वनविभागाचा संशय खरा ठरला. वनविभागाने ट्रक उघडून पाहिले असता त्यात आंबा, जांभूळ, सादडा या जातीचे अवैध रित्या तोडलेले वृक्ष गच्च भरलेले आढळून आले.

या ट्रकमध्ये अंदाजे 26 टन तोडलेल्या वृक्षाचे लाकूड (Wood) असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. या ट्रकला चालकासहित ताब्यात घेऊन कारवाईसाठी हे वाहन कार्यालयाच्या आवारात आणून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई इगतपुरी (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी (Ketan Birari) यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी दत्तू ढोन्नर, भाऊसाहेब राव, वनरक्षक स्वाती लोखंडे, गोरख बागुल, वाहनचालक शेख, वनमजुर निरगुडे, कोरडे, धोंगडे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

या कारवाईने इगतपुरी तालुक्यात अवैध झाडांची कत्तल करणाऱ्यासह लाकडांचा व्यवसाय (Wood business) करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या