Thursday, April 3, 2025
Homeधुळेगुंगीकारक औषधीसाठ्यासह एकाला अटक

गुंगीकारक औषधीसाठ्यासह एकाला अटक

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील शब्बीर नगरातील दोन हजार वस्ती परिसरात गुंगीकारक औषधीसाठ्यासह पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून एक हजारांची रोकड व 27 हजार 300 रूपये किंमतीचा अ‍ॅक्टीव्ह नावाच्या गुंगी आणणार्‍या औषधाच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

- Advertisement -

मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे काल दि. 3 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चाळीसगावरोड पोलिसांनी ही कारवाई केली. अकबर अली उर्फ अकबर जलेल्या कैसर अली शेख (वय 34 रा. शब्बीर नगर) असे त्याने त्याचे नाव सांगितले. तो गुंगी आणणार्‍या औषधे युवकांना विक्री करण्यासाठी विनापरवाना व वैद्यकीय क्षेत्राचे कोणतेही ज्ञान, पदवी व डॉक्टरांचे प्रिसक्रिप्शन नसतांना बेकायदेशीररित्या बाळगतांना मिळून आला. त्यांच्याविरोधात पोकाँ पंकज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : डुप्लिकेट चावीने कुलूप उघडून चार लाखांचा ऐवज लांबविला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून आत प्रवेश करत 11 तोळे आठ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, कानातील डायमंड व आठ हजारांची रोकड असा तीन...