अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
नगर शहरातील एका किरणामालाचे व्यापारी यांचा शनिवारी रात्री निधन झाले आहे. संबंधीत व्यापारी हा करोना पॉझिटिव्ह होता. त्याच्या उपचार सुरू असतांना त्याचे निधन झाले असले तरी मृत्यू कारण समजू शकले नसल्याचे महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
- Advertisement -
दरम्यान, शनिवारी उशीरा जिल्ह्यात आणखी २७ करोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या करोना तपासणी प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालात नगर शहरातील २५ तर संगमनेर आणि नेवासा तालुक्यातील सोनई येथील एका रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात करोना रुग्णांच्या आकडेवारीचा उच्चांक समोर आला. आधी १६ सरकारी त्यानंतर ४७ खासगी प्रयोग शाळेचे आणि रात्री उशीरा पुन्हा २७ सरकारी प्रयोग शाळेचे असे ९० करोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने समोर आले.