मेलबर्न –
ऑॅगस्टमध्ये प्रस्तावित ऑॅस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. क्रिकेट ऑॅस्ट्रेलियाने (सीए) ही माहिती दिली. तीन एकदिवसीय सामने ९, १२ आणि १५ ऑॅगस्टला खेळले जाणार होते.
’’मालिकेचे वेळापत्रक, ऑॅगस्टपूर्वी राबवण्यात येणारे जैव-सुरक्षित वातावरण, खेळाडू, अधिकारी, सहाय्यक कर्मचार्यांची सुरक्षा लक्षात घेऊन दोन्ही क्रिकेट बोर्डाने एकमताने हा निर्णय घेतला आहे. मालिका पुढे ढकलल्याबद्दल आम्हाला अतिशय वाईट वाटते आहे. पण खेळाडू, सामनाधिकारी तसेच आमच्या चाहत्यांचे यातच हित आहे. हा योग्य निर्णय आहे, असे सीएने सांगितले.
झिम्बाब्वे क्रिकेटचे सरव्यवस्थापक गिवमोर मकोनी म्हणाले, ‘ऑॅस्ट्रेलियाबरोबर मालिका खेळण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो, पण सद्य परिस्थिती लक्षात घेता हा एक योग्य पर्याय होता. आम्ही नंतर मालिका घेण्याचा विचार करत आहोत.‘
विंडीज-इंग्लंड मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे ८ जुलैपासून पुनरागमन होणार आहे. विंडीज आणि इंग्लंड या संघातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना ८ जुलै एजेस बाऊलवर खेळवला जाईल.