Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याशिक्षणाधिकारी डॉ झनकरच्या पोलीस कोठडीत वाढ; ...यामुळे गेली दोन दिवस होऊ शकली...

शिक्षणाधिकारी डॉ झनकरच्या पोलीस कोठडीत वाढ; …यामुळे गेली दोन दिवस होऊ शकली नाही चौकशी

नाशिक | Nashik

लाचखोर प्रकरणातील (Bribe Case) संशयित डॉ. वैशाली झनकर- वीर (ZP Education Officer Dr. Vaishali Zankar) यांच्या पोलीस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे….

- Advertisement -

याआधी दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली होती. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या काळात कोणतीही चौकशी करण्यात आले नसल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे वकिलांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत डॉक्टर झनकर यांची चौकशी होणे गरजेचे असल्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली.

दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पुन्हा आज एकदा त्यांना नाशिकच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दोन दिवस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे पोलिसांना चौकशी करता आली नाही, त्यामुळे त्यांच्या कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण…

संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे ३६ शिक्षकांचे नियमीत वेतन सुरु करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात झनकर यांनी प्राथमिक शिक्षक पंकज आर. दशपूते यांच्या मार्फत तक्रारदारांकडे प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे ९ लाख रुपयांची लाच मागितली होती.

त्यामुळे तक्रारदारांनी याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Thane) केली होती. विभागाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी सुरुवातीस चालकास पैसे घेताना रंगेहाथ पकडले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या