इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
तालुक्यातील बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात (Darna River Basin) आंघोळीसाठी गेलेल्या पती-पत्नी (Wife and Husbend) पैकी पतीचा बुडून मृत्यु (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार (दि.३१) रोजी दुपारच्या सुमरास बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात पुनाजी नामा वीर (वय ४५) आणि त्यांची पत्नी सखुबाई पुनाजी वीर (वय ३८) रा. बोर्ली वाघ्याची वाडी, ता. इगतपुरी हे दोघे सोबतच आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पुनाजी नामा वीर हे पोहत असतांना बुडाले. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुनाजी वीर यांचा बुडालेला मृतदेह बाहेर काढला.यानंतर पुढील उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात (Igatpuri Rural Hopital) पाठविण्यात आला.
दरम्यान, गेल्या आठवड्यातच भावली धरणात (Bhavli Dam) ५ तर वैतरणा धरणात (Vaitarna Dam) २ जणांचा बुडून (Drowning) मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर या दोन्ही घटना ताज्या असतानाच काल पुन्हा एकदा एक जण बुडाल्याची घटना घडली. त्यामुळे इगतपुरी तालुक्यावर (Igatpuri Taluka) शोककळा पसरली आहे.