Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारअंगावर झाड पडल्याने एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

अंगावर झाड पडल्याने एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

तळोदा Taloda । ता.प्र

भवरकडून खर्डी नदी मार्गे तळोदाकडे दुचाकीवरून (bike) येणार्‍या कळमसर मोहिदा येथील 40 वर्षीय तरुणाच्या (Youth) अंगावर झाड उन्मळुन (Uprooting a tree) पडल्याची घटना घडली, दरम्यान यात तरुणाचा उपचारा दरम्यान रात्री मृत्यू (Death) झाला

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, तळोद्यात दि.11 जून पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वार्‍याचा जोर इतका होता की, रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. दुचाकीवरून भवरकडून खर्डीनदी मार्गे तळोदाकडे येणार्‍या रवींद्र गुलाब ठाकरे (वय 40) रा. कळमसर मोहिदा हा कामे आटपून तळोदाकडे येत असताना अचानक त्याच्या दुचाकीवर झाड कोसळल्याची घटना घडली.

या घटनेत चालक झाडाखाली अडकून पडला होता. दरम्यान झाड कोसळल्याचा आवाज झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. रस्त्यावर जाणारे प्रवासी व जवळच असलेले धाणकावाडा येथील नागरिकांची धावपळ केली. झाडाखाली सापडलेले दुचाकीवरून त्या तरुणास बाजूला काढले व त्यास रुग्णवाहिकेला प्राचारण करून तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.

दरम्यान उपचारा दरम्यानइसमाचा रात्री मृत्यू झाला. 2 दिवसापूर्वी शहादा रस्त्यावर असलेल्या विनोद चव्हाण यांच्या समर्सिबल दुकानाचा समोरील लिंबाचे झाड मध्यरात्री कोसळल्याची घटना घडली होती. रहदारीचा परिसरात असलेल्या हे झाड मध्यरात्रीच्या सुमारास कोसळल्यामुळे सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.

दरम्यान मयत रविंद्र गुलाब ठाकरे रा,मोहिदा ता,तळोदा यांच्या घरी आ.राजेश पाडवी यांनी भेट देऊन मयताच्या कुटूंबीयांचे सांत्वन केले. लवकरात लवकर जास्तीत जास्त भरपाई मिळवुन देण्याचे आश्वासन दिले,यावेळी मोहिदा येथील ग्रामस्थ उपस्थीत होते,

- Advertisment -

ताज्या बातम्या