Friday, May 24, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; एक मृत्यू, ५ गंभीर

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; एक मृत्यू, ५ गंभीर

इगतपूरी | प्रतिनिधी | Igatpuri

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) आठव्या मैल परिसरात (Eighth Mile Area) आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कंटेनर आणि चारचाकीचा भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात एकाचा मृत्यू तर ५ जण गंभीर झाले आहेत…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मुंबई-नाशिक मार्गावर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर भरधाव वेगात असणारे महिंद्रा कंपनीचे थार वाहन क्र. एम. पी. ०९ डब्लु. एच. ९९३६ या वाहनाने पुढे जात असलेल्या कंटेनर क्र. एम. एच. ४६ ए. आर. ७४१७ याला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात महिंद्रा थार गाडीचा चालक विश्वजीत सोगरा (Vishwajit Sogra) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश ढोलपुरे, अहमद वसारी, अमित, अक्षय कानडे, शक्ती ठाकुर हे ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

नाशकात ‘मोठा मासा’ एसीबीच्या जाळ्यात; तब्बल २८ लाखांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

दरम्यान, या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी घोटी केंद्राचे महामार्ग सुरक्षा पोलीस (Police) पिंपळगाव बसवंत येथील पेट्रोलिंगचे पोलीस, वाडीव-हे व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत गोंदे फाटा येथील नानीज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांच्या मदतीने जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल केले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या