Saturday, May 4, 2024
Homeनाशिकपूजा साहित्याच्या दुकानात शिरली भरधाव पिकअप

पूजा साहित्याच्या दुकानात शिरली भरधाव पिकअप

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik highway) इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरासमोर (Ghatandevi temple near igatpuri) असलेल्या पूजेच्या दुकानात सायंकाळच्या सुमारास एका भरधाव पिक अप वाहनाने जोरदार धडक दिली….

- Advertisement -

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. पिक अप वाहन बॅरिगेट्स तोडून सरळ दुकानात शिरले. यामध्ये बबली बेडीया सिंग (रा. तळेगाव) हे ठार झाले.

एक जण गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. नशीब बलवत्तर असल्याने दुकानदारांची तीन मुले बाहेर खेळत असल्यामुळे वाचली. काल दसरा झाल्याने आज दर्शनासाठी फारशी गर्दी नव्हती.

गर्दी असती तर मोठा अपघात झाला असता. अपघात एवढा तीव्र होता की, जोरदार आवाज परिसरात झाला. या अपघातात गरीब दुकानदाराचे खुप नुकसान झाले आहे.

जखमींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय इगतपुरी येथे दाखल करण्यात आले. घटनास्थळी इगतपुरी पोलिसांनी नोंद घेऊन पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांती तपास सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या