Saturday, May 18, 2024
Homeनाशिकनाशकात अपघात, एकाचा मृत्यू

नाशकात अपघात, एकाचा मृत्यू

नाशिक | Nashik

गतीरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात (Two Wheelar Accident) आशाबाई मोतीलाल बिरारी (Ashabai Birari) (४७, रा. खडकपाडा) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली…

- Advertisement -

आशाबाई या त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून जत्रा हॉटेलहून जेलरोडच्या (Jailroad) दिशेने जात होत्या. नांदुरगाव (Nandurgaon) येथे शाळेसमोरील गतीरोधकावर दुचाकी आदळल्याने आशाबाई खाली पडल्या. त्यात डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल केले.

मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात (Adgoan Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या