Monday, May 27, 2024
Homeनाशिकगोल्फ क्लब येथे व्यायाम करतांना एकाचा मृत्यू

गोल्फ क्लब येथे व्यायाम करतांना एकाचा मृत्यू

नाशिक | Nashik

भाभा नगर येथील स्मार्ट सोसायटी येथे राहणाऱ्या ६७ वर्षीय वृद्धाचा व्यायाम करत असतांना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

- Advertisement -

शामसुंदर हरिहर तालुकदार असे या वृद्धाचे नाव आहे. काल (दि.०२) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तिडके कॉलनीजवळ असलेल्या गोल्फ क्लब ग्राउंडवर शामसुंदर तालुकदार हे व्यायाम करीत होते.

यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते बेशुद्ध पडले. आजूबाजूच्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली असता पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या वृद्धाला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे नेण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये उपस्थित तडवी मॅडम यांनी तपासून मयत असल्याचे घोषित केले. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या