Saturday, May 4, 2024
HomeजळगावAccident #एकाने दिली धडक तर दुसर्‍याने दुचाकीस्वाराला चिरडले

Accident #एकाने दिली धडक तर दुसर्‍याने दुचाकीस्वाराला चिरडले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

घराकडे परतणार्‍या दुचाकीस्वाराला (biker) भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनाने जोरदार (Hit vehicle) धडक दिली. यात दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने मागून भरधाव वेगाने जाणार्‍या दुसर्‍या ट्रकने (truck crushed)त्यांना चिरडल्याने विवेक प्रकाशराव पाटील (वय-42, रा. धरणगाव ता. जळगाव) यांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना मानराज पार्कजवळ घडली होती. याप्रकरणी दोघ वाहनचालकांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

धरणगाव तालुक्यातील कुलदीपसिंग तेजेदसिंग चंदेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विवेक पाटील हे दि. 23 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्याकडील (एमएच 19 सीएच 1396) क्रमांकाच्या दुचाकीने मानराज पार्क समोरील ह्युंदाई शोरुम समोरुन धरणगावकडे जात होते. याचवेळी मागून भरधाव वेगाने येणार्‍या (एमएच 04 एचएस 2028) वरील चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात विवेक पाटील हे रस्त्यावर पडून ते गंभीर जखमी झाले. याचवेळी मागून भरधाव वेगाने येणार्‍या (एमएच 04 एचएस 2014) क्रमांकाच्या वाहनाने त्यांच्या अंगावरुन नेत त्यांना चिरडले.

या विचित्र अपघातात विवेक पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोघ वाहनांवरील चालकांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विकास महाजन हे करीत आहे. दरम्यान, भरधाव वाहने महामार्गावरुन धावत असल्याने नागरिकांसाठी महामार्ग मृत्यूचा सापळा ठरतो आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या