धुळे । Dhule प्रतिनिधी
शासनाने (government) बंदी (Banned) केलेल्या प्लॉस्टिकच्या पिशव्याचा (plastic bag) शहरात सर्रासपणे वापर सुरू असून त्यांची विक्री व वितरण (Sales and Distribution) केले जात आहे. हीबाब लक्षात येताच आज महापालिकेच्या पथकाने (Municipal team) दोन दुकानांवर छापा (Raid on two shops) टाकत कारवाई केली. एकुण शंभर किलो प्लॉस्टिक जप्त (Plastic confiscation) करण्यात आले. याबरोबरच दोघा दुकानदारांकडून एकुण 30 हजारांचा दंडही (Fines collected) वसूल करण्यात आला.
महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, अति.आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त डॉ.संगीता नांदुरकर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे महापालिका आरोग्य विभागामार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माजी वसुंधरा मोहिमेतंर्गत ही कारवाई करण्यात आली. शहरात पेठ भागामध्ये शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकची विक्री केली जात असल्याचे कळताच पथकाने गिरीश प्लास्टिक व सद्गुरू प्लास्टिक या दुकानांवर छापा टाकला.
तपासणी करीत सुमारे शंभर किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. प्रत्येकी 25 व 5 हजार रुपयाचा दंडही वसूल करण्यात आला. कार्यालयीन प्रमुख राजेंद्र माईनकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक गजानन चौधरी, साईनाथ वाघ, रुपेश पवार, अत्तर शेख, शुभम केदार, मुकादम अनिल जावडेकर, राजेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तंबाखू, गुटखा खाणार्यांवरही कारवाई
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत सरकारी कार्यालयांमध्ये तंबाखू, गुटखा खाणार्यांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आज तपासणी पथकाने जिल्हा परिषदेत शोध घेत 7 ते 8 गुटखा खाणार्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून जागेवरच 200 ते 500 रुपयांपर्यतचा दंड वसूल करण्यात आला. या पथकात दंत चिकित्सक डॉ. नितीन पाटील, एलसीबीचे पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, पोना. राहूल गिरी, सागर शिर्के, पोहेकॉ. योगेश चव्हाण यांचा समावेश आहे.