Tuesday, April 29, 2025
Homeधुळेदुचाकी नाल्यात कोसळून एका ठार ; दुसरा गंभीर जखमी

दुचाकी नाल्यात कोसळून एका ठार ; दुसरा गंभीर जखमी

धुळे -प्रतिनिधी dhule

भरधार दुचाकी (bike) नाल्यात कोसळून (accident) दुचाकीस्वार ठार झाला. तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. चिंतामण राजमल साबळे (वय ४० रा.जामुनपाडा पो.रोहोड ता.साक्री) असे मयताचे नाव आहे. तो दि.१२ रोजी दुपारी त्यांच्या दुचाकीवर (क्र. एमएच ३९ टी ३९२३) भरत चुनिलाल कामडे (वय २२ रा. चिंचपाडा) यास मागे बसवून जामुनपाडा ते रोहोड रस्त्याने भरधाव वेगाने जात होता.

- Advertisement -

त्यादरम्यान रेट्या नाल्याजवळ त्याचे नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी थेट नाल्यात कोसळली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चिंतामण साबळे हा ठार झाला. तर भरत कामडे हा देखील डोक्याला मार बसून गंभीर जखमी झाला. दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याबाबत उत्तम राजमल साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना डी.के.कोळी करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

हॅक

IndiaVsPakistan: तणावपुर्ण वातावरणातही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. सततच्या दहशतवादी कारवायांमुळे या सर्वांच्या मागे...