Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरिक्षा उलटून एक ठार; चार जण गंभीर जखमी

रिक्षा उलटून एक ठार; चार जण गंभीर जखमी

खामखेडा । वार्ताहर Khamkheda

सटाणा-खामखेडा रस्त्यावर खामखेडा शिवारात आज बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात 68 वर्षीय वृद्धा जखमी होवून जागीच ठार झाली तर चार प्रवासी जखमी झाले आहेत.

- Advertisement -

मालेगाववरून कळवणकडे भरधाव जाणारी रिक्षा क्र. एम.एच.-19-ए.एक्स-9784 खामखेडा चौफुलीलगत उलटली. यात रिक्षातील शांताबाई रामदास राऊत (68, सोयगाव, ता. मालेगाव) या वृध्दा रस्त्यावर आदळून जागीच गतप्राण झाल्या. तर सुनीता कैलास मोरे, भोला कैलास मोरे, गुंडू कैलास मोरे (सर्व रा. मालेगाव कॅम्प) तसेच वीर युवराज कुवर (रा. द्याने) हे गंभीर जखमी झाले.

अपघातातील जखमींना आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेतून उपचारासाठी कळवण उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले गेले. रिक्षामधील सर्व प्रवासी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला.

 

ताज्या बातम्या

स्फोटक

स्फोटक साठा प्रकरण: होलसेलरची एटीएसकडून चौकशी; एक्सपायर्ड अन् दुसऱ्याच्या नावावरील परवान्यावर...

0
नाशिक। प्रतिनिधीतालुक्यातील आंगणगाव येथे दहशतवादविरोधी पथकाच्य (एटीएस) नाशिक युनिटने छापा टाकून जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. तपासादरम्यान संशयिताकडे आढळलेला स्फोटकांचा परवाना...