पेठ । प्रतिनिधी Peth
नाशिक – गुजरात राष्ट्रीय महामार्गावर करंजाळी ते पेठ दरम्यान देवगाव फाटा येथील पुलाजवळील वळणावर अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात जखमी झालेल्या चालकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
- Advertisement -
नाशिकहून गुजरातकडे जाणारा ट्रक (टीएन-52-एल-1085) हा देवगाव फाटानजिक उतरावर चालकाचा ताबा सुटल्याने पुलाच्या पुढील वळणावर पलटी झाला. यामध्ये चालक कलईसेलवन शिवलिंगम रा. सेलम तामीळनाडू हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर अवस्थेत आहे.
या अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झाले. याबाबत पेठ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.