वावी | वार्ताहर Vavi
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मरळ शिवारात( 552 चैनल नंबर) या ठिकाणी शुक्रवार दिनांक 1 च्या भल्या पहाटे चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून क्लीनर जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
छत्रपती संभाजी नगर येथून मालवाहतूक करणारा पिकप क्रमांक एम एच १६ सीडी 70 39 मुंबईकडे जाताना मरळ शिवारात वाहन चालक शाहरुख पठाण वय 24 राहणार खेड पैठण याचे गाडीवरील नियंत्रण सुटले असता पिकप रस्त्याच्या कडेला लोखंडी पॅनल ला जाऊन जोरात आदळल्याने पूर्ण गाडीचे नुकसान झाले .
यामध्ये क्लिनर फिरोज बादशहा तांबोळी वय 32 रा मुंगी पैठणयास अपघात स्थळावरून जोडी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले याबाबत सविस्तर तपास वावी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल गोडे करत आहे





