- Advertisement -
दिंडोरी। प्रतिनिधी Dindori
गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुचाकवरील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले.
धनंजय शरद वार्डे (रा. मुरकुटे गल्ली दिंडोरी), योगेश थविल (रा. इंदिरानगर, दिंडोरी) आणि अजून एक व्यक्ती (नाव माहिती नाही) असे तिघे जण (एमएच 15 एचएन 9019) या दुचाकीने नाशिक – कळवण रस्त्यावरुन जात असताना वनारवाडी शिवारातील न्यू स्टार गॅरेजसमोर असलेल्या गतिरोधकाजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी जोरात आदळली.
दुचाकी जमिनीवर पडून झालेल्या अपघातात धनंजय वार्डे हा सतरा वर्षाचा दुचाकीस्वार ठार झाला व इतर दोघे जखमी झाले.