Wednesday, June 10, 2026
Homeमहाराष्ट्रनेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही; अजितदादांना जाऊन महिना झाला, रोहित...

नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही; अजितदादांना जाऊन महिना झाला, रोहित पवारांची भावनिक पोस्ट

मुंबई | Mumbai
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या एक महिन्याच्या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीला जाणाऱ्या अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. आज रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी त्यांना कॉल केल्याची व्हाट्सअ‍ॅप चॅट शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे.

रोहित पवारांनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केलीय की, जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही..खूप वेदनादायी..! असं म्हणत त्यांनी व्हॉट्सअप चॅटचा स्क्रिनशॉट दाखवला आहे.

- Advertisement -

हे पचविणे अजूनही कठीण जात आहे – सुप्रिया सुळे
तर सुप्रिया सुळे यांनीही अजितदादांसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांची उणीव कायम भासेल असे म्हटले आहे. आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठीण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.

Miss you Dad-जय पवारांची पोस्ट
अजित पवार यांच्या आठवणीत त्यांचे पुत्र जय पवार हेही भावूक झालेले दिसले. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. Miss You Dad एवढंच त्यांनी त्यासोबत लिहीलं असून वडिलांच्य जाण्याने ते व्याकूळ झाल्याचं पोस्टवरून दिसत आहे. यापूर्वी जय पवार यांनी अजित दादांसोबतचे काही फोटो शेअर केले होते. आज अजित दादांच्या मृत्यूला एक महीना पूर्ण झाल्यालवर त्यांनी पुन्हा वडिलांची आठवण शेअर केली आहे.

दरम्यान अजित पवार यांचा विमान अपघातासंबधी करण्यात आलेल्या तपासाचा प्राथमिक अहवाल आज येणार आहे. अपघाताच नेमके कारण काय ते यातून समोर येऊ शकते, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे. तर २ मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार, रोहित पवार हे याप्रकरणी नवीन खुलासे करणार आहेत. तसेच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चाही केली होती.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...