Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याINDIA Alliance: इंडिया आघाडी अजून मजबूत होणार; आणखी एक पक्ष आघाडीमध्ये सामिल...

INDIA Alliance: इंडिया आघाडी अजून मजबूत होणार; आणखी एक पक्ष आघाडीमध्ये सामिल होणार?

नवी दिल्ली | New Delhi

देशात भाजप विरुध्द सगळ्याच लहान मोठ्या पक्षांनी एकत्र होत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. यात आता एका पक्षाची भर पडणार असून बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यासुद्धा विरोधकांच्या इंडिया आघाडीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. कारण, काही दिवसापूर्वीच कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांची भेट घेतल्याचे आज समोर आले असून, या भेटीवरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

या आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या असल्या तरी अद्यापही देशातील काही पक्ष तटस्थ असून, ते ना एनडीएचा भाग आहेत ना इंडियाचा. त्यामधीलच एक पक्ष म्हणजे मायावतींचा बसपा. या पक्षाने आपण कोणत्याही गटात जाणार नसून, तटस्थ राहणार असल्याची घोषणा केली होती. यादरम्यान मात्र आता एक मोठी घटना समोर आली असून, त्यामुळे बसपा इंडिया आघाडीत सहभागी होण्याची चर्चा होत आहे.

काही दिवसांपुर्वी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यात गेल्या महिन्यात बैठक झाली होती. आता बसपाच्या नेतृत्वाशी जवळीक साधलेल्या एका माजी खासदाराचीही यात महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपा आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये युती होती. यावेळी १२५ जागांवर काँग्रेस आणि उर्वरित २७८ जागांवर बसपा लढवणार हे निश्चित झाले होते. मात्र, त्यानंतर यामध्ये काही अडथळे निर्माण झाल्याने ही युती तुटली होती. त्यानंतर आता पुन्हा प्रयत्न केले जात आहे.

काँग्रेस बसपासोबत युती करण्यात अधिक रस घेत आहे. कारण, म्हणजे बसपाकडे अजूनही १०-१२ टक्के व्होट बँक असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी बागेश्वर विधानसभेच्या जागेबाबत सपाविरोधात केलेल्या वक्तव्याचाही याच्याशी संबंध जोडला जात आहे. हायकमांडकडून सूचना मिळाल्यानंतरच अजय राय यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या