Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्यासप्तश्रृंगीगडावरील दानपेटीतून चोरीप्रकरणी एकजण ताब्यात

सप्तश्रृंगीगडावरील दानपेटीतून चोरीप्रकरणी एकजण ताब्यात

सप्तश्रृंगीगड । वार्ताहर Saptshrungi Gad

सप्तशृंगी गडावर( Saptshrungi Gad) दानपेटीतील चोरी झाल्याप्रकरणी काल एका संशयितावर कळवण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. आज मात्र पोलिसांनी दूसराच संशयित ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दानपेटीतील नोटा चोरीप्रकरणी सप्तशृंगी देवी संस्थान अंतर्गत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांवरच काल संशय व्यक्त करीत गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र मात्र आज (दि.5 ) कळवण पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान नागरे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश निकम यांनी गुप्त तपास केला.

तेव्हा त्यांनी संशयित सचिन प्रकाश डंबाळे(राहणार, गुरुदेव आश्रम नजिक, सप्तश्रृंगीगड) याला अटक केली. त्याने चोरी केल्याची कबुली दिली असल्याने त्याच्यावर भा.द.वी कलम 379.427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे कळवण पोलिसांनी नमूद केले आहे. पुढील तपास कळवण पोलीस उपनिरीक्षक महेश निकम करत आहे

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सप्तशृंगी गडावर महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे कार्यरत सुरक्षारक्षक सोमनाथ हिरामण रावते यांच्यावर ट्रस्टच्या व्यवस्थापकांनी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आज मात्र दूसराच व्यक्ती चोरी प्रकरणात पोलिसांनी धरला, ही बाब गडावर चांगलीच चर्चेत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या