अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात चोर शिकला. या चोराने त्याच्यावर जीवघेणा हल्ला. सैफवर चाकूने सपासप वार केले. सैफ यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांची चौकशी केली होती. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. पोलिसांनी सैफ अली खान हल्ल्याप्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
ताब्यात घेतलेला व्यक्ती कोण आहे? त्याला कुठून ताब्यात घेतलय? CCTV फुटेजमध्ये जो चेहरा दिसला, तो हाच आरोपी आहे का? या बद्दल अजून अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही. थोड्याचवेळात पोलीस याची माहिती देतील. ताब्यात घेतलेला माणूस हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या हल्लेखोरासारखाच दिसत आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या एकूण 35 टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 15 पथके मुंबई गुन्हे शाखेची असून 20 पथके पोलिसांची आहेत.