Saturday, May 18, 2024
Homeजळगावएक फेरा तुमच्यासोबत साता जन्मासाठी !

एक फेरा तुमच्यासोबत साता जन्मासाठी !

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

एक फेरा दिर्घायुष्यासाठी…. (One round for longevity)एक फेरा तुमच्यासोबत साता जन्मासाठी (One round with you for seven births) अशी प्रार्थना करीत वटसावित्रीच्या सणाचे (festival of Vatsavitri) औचित्य साधत सुवासिनींनी (Suvasini) वृटवृक्षाचे पूजन करत, (worships Vritvriksha) त्यास प्रदक्षिणा घातली. यावेळी सुवासिनींनी (Suvasini) वडाच्या झाडाचे रोपण करुन त्याच्या संवर्धनाची जबाबदारीही स्वीकारली.

- Advertisement -

वटसावित्रीच्या सणाला (festival of Vatsavitri) हिंदू, विशेषत: महाराष्ट्रातील महिलांमध्ये विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्त पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना (Prayer for husband’s longevity) केली जाते. मंगळवारी या सणाचे औचित्य साधून महिलांनी वटवृक्षाचे पूजन (worships Vritvriksha) केले. वडाच्या झाड्याला सुताचा धागा गुंडाळत त्यास प्रदक्षिणाही घातल्या. वड हा आपल्या सावलीत, सानिध्यात अनेक जिवन उपयोगी घटकांना वाढवत राहतो. या वृक्षाची सर्वात दाट सावली असते.

आयुर्वेदातही या वृक्षाचे महत्त्व आहे. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेचे औचित्य साधून समर्पण संस्था (Dedication Institution) संचालित सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालयात महिला पालकांच्या हस्ते शहरातील विविध परिसरात वडाच्या झाडाची रोपे (Vada tree seedlings) लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना नन्नवरे सरला गिरासे, ऋतुजा घीर्निकर, रेखा देशपांडे, कल्पना व शीतल चव्हाण, मनीषा पाटील, प्रा. अस्मिता सोनवणे, शिक्षिका माधुरी पाटील, पूजा पाटील, पिंप्राळा शिवारातही माजी नगरसेविका ज्योती इंगळे, यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

वटपौर्णिमेनिमित्त पुजेसाठी लागणार्‍या आंब्यांनीही (mangoes) आज मोठा भाव खाल्ला. 80 ते 120 रुपयांपर्यंत आंब्यांची विक्री होत होती.

वटसावित्रीनिमित्त जिल्ह्यात सुवासिनींनी पतीच्या दिर्घाष्युसाठी वडाच्या झाडाचे पुजन केले. यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचार्‍यांनी वडाचे रोप रोपण करुन वटपौर्णिमेच्या दिवशी झाडे लावा, झाडे जगवाचा अनोखा संदेश दिला. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, लिला कोसोदे, प्राजक्ता केदार, मंदा सुर्यवंशी, अनिता पाटील, अलका पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या