Monday, May 5, 2025
Homeधुळेतर्‍हाडीतील खूनप्रकरणात एकास तीन वर्ष सक्तमजुरी

तर्‍हाडीतील खूनप्रकरणात एकास तीन वर्ष सक्तमजुरी

धुळे । dhule। प्रतिनिधी

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील तर्‍हाडी (Tardi) येथे पित्याला जिवे मारण्याचा (trying kill the father) प्रयत्न करीत मुलीचा गळा -Girl strangled to death= दाबून खुन केल्याप्रकरणी एकास (one) न्यायालयाने (Court) तीन वर्ष सक्तमजुरीची (Three years of hard labor) शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एच. सैय्यद यांनी दिला आहे.

- Advertisement -

तळोदा येथील खान्देशी गल्लीत चोरी : 52 हजाराचा ऐवज लंपास

ही घटना दि.23 जुन 2018 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तर्‍हाडी येथे घडली होती. फिर्यादी भगवान सुका अहिरे यांनी लोटन पितांबर अहिरे यास वापरण्यास दिलेली सोन्याची अंगठी परत मागु नये, म्हणून आरोपी लोटन अहिरे (सध्या फरार), भटु पितांबर अहिरे, पितांबर भगा अहिरे व धु्रपदाबाई पितांबर अहिरे यांनी फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीच्या पत्नीस शिवीगाळ, दमदाटी केली. भटु व धु्रपदाबाई यांनी फिर्यादीचे दोघे हात धरून आरोपी लोटन याने फिर्यादी यांचे घरातील झोक्याच्या दोरीने फिर्यादी यांचा गळा दाबुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

VISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपित

तर आरोपी पितांबर भगा अहिरे यांनी फिर्यादीची मुलगी शालीनी हिचे पोटावर जोरात लाथ मारून तिचा गळा दाबुन तिस जिवे ठार मारले. म्हणुन शिरपुर शहर पोलिस खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासानंतर आरोपींविरुध्द न्यायालयांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

दिव्यांगांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

या प्रकरणाचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एच. सैय्यद यांच्या न्यायालयात चालले. त्यात सरकार पक्षातर्फे अति सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. भारत दयाराम भोईटे यांनी कामकाज पाहिले. तसेच त्यांना प्र.सहा. संचालक संजय मुरक्या व अति सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. जगदीश सोनवणे यांनी सहकार्य केले.

प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण 6 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने साक्षीदारांची साक्ष ग्राहय धरुन आरोपी पितांबर भगा अहिरे यांना भांदवि कलम 325 नुसार दोषी धरुन 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 50 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणुन मयताची आई ज्योतीबाई अहिरे यांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

बस मधून दाम्पत्याचे 52 ग्रॅम सोने लंपास

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Akole : राजूर येथील काविळ साथ रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा

0
राजूर, अकोले |प्रतिनिधी| Rajur| Akole राजूर येथे काविळचा प्रादूर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे...