धुळे । dhule । प्रतिनिधी
तरडी (ता.शिरपूर) शिवारात शुक्रवारी दोन्ही हात मागे बांधलेले आणि ओढणीच्या सहाय्याने गळफास (hanging) दिलेल्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत मृतदेह (dead body) आढळून आला. त्यामुळे गावाच एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपीने खून करून मृतदेह येथे टाकून पुरावा नष्ट केला. याप्रकरणी थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मोतीलाल बागुलाल परदेशी (रा. हिसाळे ता. शिरपूर) यांंनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तरडी शिवारातील गोविंद हिरालाल परदेशी यांच्या शेत गट नं. 214 मधील मक्याच्या शेतात दि. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. त्याचा दोन्ही हात ओढणीने पाठीमागे बांधून व ओढणीने गळा आवळून खून केल्याचे दिसून आले.
त्यानुसार अज्ञात इसमाने काहीतरी कारणावरून त्याचा कोठेतरी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतात आणून टाकल्याचे अज्ञात आरोपीवर भादंवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे हेे करीत आहेत.