Monday, March 31, 2025
Homeनंदुरबारजाब विचारल्याचा कारणावरून एकावर चाकूने वार

जाब विचारल्याचा कारणावरून एकावर चाकूने वार

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यातून चाकुने वार करीत एकाला गंभीर जखमी केल्याची घटना काठी येथे घडली. याप्रकरणी दोघांविरूध्द मोलगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अक्कलकुवा तालुक्यातील काठीचा डेमलीपाडा येथील रोहिदास जालमा वळवी यांनी मारहाण करण्यात आली. दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याचा राग येवून उमेद गोविंदसिंग पाडवी याने धारदार चाकुने तळहातावर वार करून गंभीर जखमी केले तसेच शिवीगाळ करण्यात आली. याबाबत रोहिदास जालमा वळवी यांनी मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदमेसिंग गोविंदसिंग पाडवी, चेतन जहांगीर वळवी या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या